हरिच्श्रंद्रगड
सह्यद्रिच्या माथ्यावर असलेला हरिच्श्रंद्रगड
प्रतेक ऋतूत आपल्या सैंदर्याची सप्तरंगी रुपे घेऊन येत असतो. मुसळधार पावसात
हिरव्यागार फुलांनी बहरलेल्या हरिच्श्रंद्रगडावर जागोजागी कोसळणारे धबधबे मन मोहुन
टाकतात. अहमदनर जिल्ह्यातील अकोल तालुक्यातील हे ठिकांन आहे. येथे आल्यावर
निसर्गाशी गट्टी जमते. पूर्वेकडे घनदाट जंगलांनी व्यापलेले सह्याद्रीचे उंच कडे ,
या परिसराल लाभलेले निसर्गसैंदर्य पर्यटकांना खुणावत असते.
कोथळ ही बस हरिच्श्रंद्रगडाच्या पायथ्याशी
जाते. कोथळपासून पुढे गेले कि हिरवीगार वनराई, उंच –उंच झाडे पर्यटकांच्या
डोळ्याचे पारणे फेडतात. हरिच्श्रंद्रगडाची उंची ही १४२४ मीटर इतकी आहे. हरिच्श्रंद्रगड
पाहण्यासाठी जातांना कोथळे गावापासुन नयनरम्य दृश्ये नजरेत सामावून घेत गड धो-धो
कोसळणा-या धबधब्यांचा व निसर्गाचा आनंद घेता येत आपण गडावर कधी पोहचलो हे कळतही
नाही गडाच्या पायथ्याशी गेल्यानंतर होन्ही बाजुच्या गगनचुंबी कड्यांवरुन खोसळणारे
धबधवे थांबायला भाग पाडतात. या धबधब्यांखाली चिंब भिजल्याशिवाय निसर्ग पर्यटक
पावले पुढे टाकत नाही. गडावर परिसरातील ग्रामस्थांनी तंबू उभारुन राहण्याची सोय
केली आहे. त्यामुळे येथे मुक्कमाला थांबून भाजी भाकरी, डाळभात, पोहे, चहा अशा
घरगुती आदरतिथ्याचा आस्वाद घेता येतो.
मुंबई-कल्याण-खुबीफाटा-खरेश्र्वर मार्गे माळशेज घाटातून आपण हरिच्श्रंद्रगडावर
पोहोचु शकतो. पुण्याहून खाजगी वाहनाने आळेफाटामार्गे तुम्ही
पुणे-आळेफाट-खुबीफाटा-खिरेश्र्वर असे हरिच्श्रंद्रगडावर जाऊ शकता.
No comments:
Post a Comment