Sunday, 8 January 2017

सौदर्य सह्याद्रीचे.....

सौदर्य सह्याद्रीचे
रोज सकाळी ऊठून काम, शाळा कॉलेज, तोच तोच पणा आला आहे ना तर मग चला थोडासा त्यात बदल करु व निसर्गाचे सौदर्य त्यात असणारी गुलाबी थंडी त्या हवेचा गारवा त्यात धुक्यामध्ये लपलेल्य डोगर रांगा, डोंगरावरुन पडना-या धबधब्याचा आनंद घेऊ.

हिरवी शाल पाघरुन नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या, पर्यावरण प्रमींना आकर्षीत कना-या महाराष्ट्राला लाभलेली नैसर्गिक देणगीचा भरभरुन आनंद लुटु.......तर मग चला सह्याद्रीला.
कळसुबाई
कळसुबाई हे महाराष्ट्रातली सर्वोच्च गिरीशिखर अहमदनगर या जिल्हयात आहे. पावसाळ्यामध्ये ट्रेकिंग करण्यासाठी गिर्यारोहकांचे हे अतिश्य पहिल्या पसंतीचे ठिकांन होय. पावसाळ्याच्या दिवसामध्ये वा-या आणि पाऊस त्याची मजाच वेगळी असते या शिखराच्या माथ्यावर कळसुबाई मंदिर आहे. या शिखरावर चढण्यासाठी लोखंडी पाय-या सुध्दा आहेत. तसेच या शिखराची सुरवात ही बारी गावापासुन सुरु होते बारी हे गाव भंडारद-यापासुन सहा ते सात किमी अतंरावर  आहे या शिखराची उंची ही सुमारे १६४६ मीटर आहे या शिखरावर जाण्यासाठी रेल्वे, बस तसेच खाजगी वाहनाने जाऊ  शाकतात. मध्ये रेल्वेचे घोटी स्थानक हे जवळचे रेल्वे स्थानक आहे या ठिकानाऊन बसने बारी गावात जाण्यासाठी बस सेवा उपलब्ध असते. तसेच महाराष्ट्र परिवाहन महामंळाच्या बसने इगतपुरी-मुंबई बस पकडूनही तुम्ही बारी गावापर्यत पोहोचु शकता. राहण्याच व्यवस्था बारी गावामध्ये आहे हिरवी शाल पाखरुन नटूण बसलेल्या कळसुबाईला जरुरु जरुरु भेट देऊ.

No comments:

Post a Comment