Sunday, 8 January 2017

देशातील जनतेची दिशाभुल का करत आहे.........

 देशातील जनतेची दिशाभुल का करत आहे.........
मागील काही महीन्यामध्ये भारतीय जनत पार्टी च्या केद्रच्या सत्तेला दोन वर्षे पुर्ण झाली त्या वेळेस काही विरोधकानी विरोध करायचा म्हणुन विरोध केला व त्याच्या दोन वर्षे कालखंड पुर्ण झाल म्हणुन श्राद्ध साजरे केले
त्या वेळेस ते म्हणत होते की सरकार काहीहचं काम करत नाही आहे सैनिक मरता आहे मोदी काही करत नाही, काळ पैसा वाढला आहे मोदी काहीच करत नाही महागाई वाढली आहे मोदी काही करत नाही, शेतकरी आत्महात्या करत आहे मोदी काहीच करत नाही.....अशा प्रकारचा त्यांचा पाढाच सुरु झाल होत..........
परंतु मागिल महीन्यात मोदीनी सर्जीकल स्ट्रईक घडवुन आनला त्यात देशाली सैनिकांनी मह्त्तवाची कामगीरी केली व पाकिस्तानच्या भुमित त्यांच्या  सैनिकाचा धुवा उडवला.... जनते सैनिकाचे कैतुक केले परंतु विरोधकांन विरोध करायचा म्हणुन विरोध सुरु झाल व ते पुरावे मागु लागले व जनतेला सांगु लागले असे काही झालेच नाही अशा प्रकारे समाज कंठक जनतेची दिशाभुल करु लागले.....
 त्याच प्रमाने भारत सरकारने  चलनातुन हजार पाचशे च्या नोटा हद्दपार केल्या व दोन हजारची नोट चलनात आणली या सर्वाचा लोकांन त्रास होत आहे परंतु त्याना महीत आहे की आपला घामचा पैसा आहे त्यामुळे आपल्याला काहीही धोका नाही म्हणुनच ते त्या प्रमाने बँका atm च्या बाहेर शिस्तंबध बँक सुरु होण्याअगोदर उभे राहुन आपल्या दैनंदीन गरजा पुर्ण कर-यासाठी पैसे काढत आहे आपल्य कष्टाचे पैसे बँकेत जमा करत आहे जर जनतेल याच विरोध असता तर ते कुठतरी उपोषनाल बसले नसते का ? त्यात ही विरोक टिका करु लागले...
म्हणुन जनतेने  या समाज कंठाचे न ऐकता आपन केलेल्या मतदानचा निर्णय योग्यचं होता कुठेतरी काहीतरी सकारात्मक बदल होत आहे याचा फायदा नक्कीच आपल्याला होईल सत्य परेशान होता है, पराजित नही....


हरिच्श्रंद्रगड

हरिच्श्रंद्रगड
सह्यद्रिच्या माथ्यावर असलेला हरिच्श्रंद्रगड प्रतेक ऋतूत आपल्या सैंदर्याची सप्तरंगी रुपे घेऊन येत असतो. मुसळधार पावसात हिरव्यागार फुलांनी बहरलेल्या हरिच्श्रंद्रगडावर जागोजागी कोसळणारे धबधबे मन मोहुन टाकतात. अहमदनर जिल्ह्यातील अकोल तालुक्यातील हे ठिकांन आहे. येथे आल्यावर निसर्गाशी गट्टी जमते. पूर्वेकडे घनदाट जंगलांनी व्यापलेले सह्याद्रीचे उंच कडे , या परिसराल लाभलेले निसर्गसैंदर्य पर्यटकांना खुणावत असते.
कोथळ ही बस हरिच्श्रंद्रगडाच्या पायथ्याशी जाते. कोथळपासून पुढे गेले कि हिरवीगार वनराई, उंच –उंच झाडे पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडतात. हरिच्श्रंद्रगडाची उंची ही १४२४ मीटर इतकी आहे. हरिच्श्रंद्रगड पाहण्यासाठी जातांना कोथळे गावापासुन नयनरम्य दृश्ये नजरेत सामावून घेत गड धो-धो कोसळणा-या धबधब्यांचा व निसर्गाचा आनंद घेता येत आपण गडावर कधी पोहचलो हे कळतही नाही गडाच्या पायथ्याशी गेल्यानंतर होन्ही बाजुच्या गगनचुंबी कड्यांवरुन खोसळणारे धबधवे थांबायला भाग पाडतात. या धबधब्यांखाली चिंब भिजल्याशिवाय निसर्ग पर्यटक पावले पुढे टाकत नाही. गडावर परिसरातील ग्रामस्थांनी तंबू उभारुन राहण्याची सोय केली आहे. त्यामुळे येथे मुक्कमाला थांबून भाजी भाकरी, डाळभात, पोहे, चहा अशा घरगुती आदरतिथ्याचा आस्वाद घेता येतो.
मुंबई-कल्याण-खुबीफाटा-खरेश्र्वर मार्गे माळशेज घाटातून आपण हरिच्श्रंद्रगडावर पोहोचु शकतो. पुण्याहून खाजगी वाहनाने आळेफाटामार्गे तुम्ही पुणे-आळेफाट-खुबीफाटा-खिरेश्र्वर असे हरिच्श्रंद्रगडावर जाऊ शकता.

ताम्हिणी घाट

ताम्हिणी घाट
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या पश्र्चिम घाटामध्ये निसर्गरम्य ठिकाण म्हणजे ताम्हिणी घाट होय. पावसाळ्यात निसर्गरम्य ठिकाण म्हणजे ताम्हिणी घाट होय. पावसाळ्यात निसर्गसैंदर्य भरभरुन अनुभवयाचे असेल तर ताम्हिणी घाटला आवर्जुन भेट द्यायला हवी. रुक्ष करडा रंग टाकून घाट हिरवी शाल पांघरतो येथे मुळशी धरणाचा नयनरम्य देखावा बघायला मिळतो आणि या छोट्याशा वर्षासहलीला नदीतील साहसी खोळांची जोड देता येता.
ताम्हिणी घाटात जाण्यासाठी मुंबई –गोवा महामार्गाने कोलाडपर्यत जावे लागते. कुंजलिका नदीवरील पुल ओलांडला की, डाव्या बाजूला मुळशी धरणावरुन पुढे पुण्याला जाणारा रस्ता लागतो. कोलाड आणि मुळशी धरणाच्या मधल्या भागात हा ताम्हिणी घाट आहे. थोड्या चढावावरुन पुढे गेले की, एखाद्या स्वप्नांच्या दुनियेत आल्यासारखे वाटते. लांबच लांब पसरलेले हिरवेगार मखमली गालिचे, ओखंबून खाली आलेले ढग , खळखळणारे निर्झर आणि मधुनच डोकवणारे धबधब्ये पाहताना डोळ्याचे पारणे फिटते. घाटातील वळणावरळणावर नयनरम्ये, विहंगम देखानेजणु काही आपली वाट असतात पावसाळी धुक्यात जणु डोकी हरवलेल्या टेकड्या आकाशात उंच झेपावत आहेत असे वाटते. टेकड्याच्या या भल्याथोरल्या भिंती त्यावर अलगद उतरणारे ढग वातावरण भारुवुन टाकतात. काळ्या ढगांभोवती टालणारा हा ऊन पावसाच खेल जणुकाही एखाद्या दिव्याची ज्योत थरथरावी असा भासतो. हा मनोहारी खोळ पाहताना आपण मंत्रमुग्ध ताम्हिणी घाट

त्याच्या वळणवाटातुन असा स्वर्गीय सुखाचा अवुभव देतो. मुंबईपासुन १४० किमी तर पुण्यापासुन दौंड पस्त्याने ९३ किमी एवढ्या अंतरावर आहे. मुंबईडुन योताना मुंबई-पुणे महामार्गावर लोणावळा येथे वाहेर पडावे लागते. लोणावळ्यापासुन बीव्हँली रस्तयाने ताम्हिणी घाटाकडे जाता येते. 

सौदर्य सह्याद्रीचे.....

सौदर्य सह्याद्रीचे
रोज सकाळी ऊठून काम, शाळा कॉलेज, तोच तोच पणा आला आहे ना तर मग चला थोडासा त्यात बदल करु व निसर्गाचे सौदर्य त्यात असणारी गुलाबी थंडी त्या हवेचा गारवा त्यात धुक्यामध्ये लपलेल्य डोगर रांगा, डोंगरावरुन पडना-या धबधब्याचा आनंद घेऊ.

हिरवी शाल पाघरुन नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या, पर्यावरण प्रमींना आकर्षीत कना-या महाराष्ट्राला लाभलेली नैसर्गिक देणगीचा भरभरुन आनंद लुटु.......तर मग चला सह्याद्रीला.
कळसुबाई
कळसुबाई हे महाराष्ट्रातली सर्वोच्च गिरीशिखर अहमदनगर या जिल्हयात आहे. पावसाळ्यामध्ये ट्रेकिंग करण्यासाठी गिर्यारोहकांचे हे अतिश्य पहिल्या पसंतीचे ठिकांन होय. पावसाळ्याच्या दिवसामध्ये वा-या आणि पाऊस त्याची मजाच वेगळी असते या शिखराच्या माथ्यावर कळसुबाई मंदिर आहे. या शिखरावर चढण्यासाठी लोखंडी पाय-या सुध्दा आहेत. तसेच या शिखराची सुरवात ही बारी गावापासुन सुरु होते बारी हे गाव भंडारद-यापासुन सहा ते सात किमी अतंरावर  आहे या शिखराची उंची ही सुमारे १६४६ मीटर आहे या शिखरावर जाण्यासाठी रेल्वे, बस तसेच खाजगी वाहनाने जाऊ  शाकतात. मध्ये रेल्वेचे घोटी स्थानक हे जवळचे रेल्वे स्थानक आहे या ठिकानाऊन बसने बारी गावात जाण्यासाठी बस सेवा उपलब्ध असते. तसेच महाराष्ट्र परिवाहन महामंळाच्या बसने इगतपुरी-मुंबई बस पकडूनही तुम्ही बारी गावापर्यत पोहोचु शकता. राहण्याच व्यवस्था बारी गावामध्ये आहे हिरवी शाल पाखरुन नटूण बसलेल्या कळसुबाईला जरुरु जरुरु भेट देऊ.