सकाळी सकाळी काँलेजला जाण्यासाठी 7:07
मिनिटांची लोकल होती. धावत धावत स्टेशन वर
गेलो तर तेथे ट्रेन लेट होती, आजु बाजुला असलेल्या प्रवाशांना विचाले ट्रेन का लेट
आहे, तर त्यांनी थेट हे स्टेशन मास्तर
पासुन ते रेल्वे मंत्री, प्रधानमंत्री याचा उधार करायला सुरवात केली आणि त्यांच्या चर्चा सुरु झाल्या चांगल्या सुविधा देण्यासाठी
काय करायला हवे नि काय करु नये.... हे सर्व सामान्य प्रवाशांचे मत पण प्रवाशानो आपण काय करायला हवे ....
मुंबईकरांसाठी त्याची लाईफ लाईन ही सकाळी 4:12
मिनिटांची सुरु होत तर रात्री 12.34 पर्यत ही धवत असते जगामध्ये दुर-या क्रमांक हा
मुंबई मधील लोकलचा लागतो सर्वात जास्त लोकसंख्या ने आण करण्याच काम ही लोकल करत
असते. अत्यंत कमी शुल्कामधे लोकल प्रवास
हा होत असतो भारतातील सर्वात स्वस्त वाहतुक सेवा म्हणुन रेल्वे आपले काम करत आहे
प्रत्येक प्रवाशाच्या टिकिटामध्ये रेल्वे ला 36 टक्के तोटा होतो. प्रवाशासाठी मोफत
वायफाय सेवा सुध्दा पुरवत आहे, त्याच बरोबर इतर ही सेवा रेल्वे कडुन पुरवल्या
जातात.ऐवढ्या मोठ्या प्रमाणात सेवा पुरवताना काही प्रमाणात चुका ह्या रेल्वे
प्रशासनाच्या ही आहेत पण त्याच बरोबर काही चुका ह्या प्रवाशाच्याही आहे हे मान्य करु या
सकाळच्या पहील्या फेरीपासुन रेल्वेमधील ती बाई पहील्या प्रवाशाना सांगत
असते...रेल्वे रूल ओलांडू नका, थुंकु नका,
विना टिकीट प्रवास करु नका, चालत्या ट्रेन मधुन डोकाऊ नका,कागदाचे तुकडे आणि
फळांचे आवरणे कचराकुंडीच टाका, रेल्वे परिसर स्वच्छ ठेवा पण त्या सूचना कडे लक्ष न
देता तोंडात तंबाखु किंवा पान खाऊन रुळावर थुंकत हे प्रवासी हे विराटने कसे खेळावे
व मोदी ने काय करावे. विराट मोदी त्यांचे काम ते
करतील आज पासुन आपण आपले काम करु नवा इतिहस घडुन माझ्या लोकलचे नाव जगात
प्रत्येक जण घेईल असे काम करु...... शिस्तीनेच राष्ट्र घडते, चला मग संकल्प करु आपली ट्रेन आपणच स्वच्छ ठेऊ....
No comments:
Post a Comment