लोकांनी, लोकांनसाठी व लोकांच्या हितासाठी
चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही ही भारतामध्ये अस्तीत्वात आहे.भारतातील लोकशाहीमुळेच
राजकारणात लोकांचा प्रत्यक्ष सहभाग शक्य आहे. लोकांनी निवडुन दिलेला नेता देशाची,
प्रदेशाची कामगिरी पाहतो. यामुळेच
बहुमताने निवडूण गेलेला नेता नागरिकांच्या मतदानामुळेच राज्य करु शकतो.
जगातील
विविध देशांमध्ये अशा वेगवेळ्या राज्यपध्दतींचा अवलंब केला जातो. हुकुमशाही राज्य
अधिक जहाल व काटेकोर वाटते. त्या मानाने लोकशाही राज्यापध्दती मवाळ व नागरीकांच्या
मताला महत्व देणारी अशी असते. मात्र,
जेव्हा लोकशाही ही हुकुमशाही राज्यपध्दती
सारखी वागू लागते त्यावेळी मात्र, लोकशाही व लोकांचे राज्य हे नावापुरताच उरते. निवडणुकीत नेता
निवडून आल्यानतंर त्याच्या कामाच्या कालावधीत त्य नेत्याची कामगिरी त्याची पुढील राजकीय कारकिर्द निश्चित करत असते.
प्रदेशातील सुख-सोयी, त्यांच्या मुलभूत गरजांची योग्यरित्या पुर्तता करण्याचे
महत्वाचे कर्तव्य या नेत्याचे असते. तसेच आणखी एक महत्वाची जबाबदारी या नेत्यावर असते
ती म्हणजे नागरिकांच्या सरंक्षणांची. ते ज्या प्रदेशात राहातात तिथे सुरक्षितता
असल्याची भावना व विश्र्वास त्यांना असायला हवा. अशा विविध गुणांनी व कामगिरींनी
समृद्ध नेता मिळणं कठीणंच झालय म्हणा......! पण, ज्या नेत्याविषयी असा विश्र्वास वाटतो त्या
नेत्याला लोक मतदान करतात. ज्यामुळे, योग्य नेता निवडून देण्याची ताकत मतदानातच व
नागरिकांतच असल्याचे दिसते. मात्र, या ताकदीची किमया योग्यरित्या दाखवली जात नाही.
त्याचे प्रमाण ही कमी झाले आहे. नेत्यांच्या, राजकराणी लोकांच्या मळलेल्या व
मनातुन उतरलेल्या प्रतिमेला मत देण्याची
इच्छाच आता उरलेली नसल्याचे दिसते
पण, यातुन देशाला होणारा तोटा मात्र
नागरिकांनो आपल्यालाच होणार आहे. मतदानाचे महत्त्व समजून घेणं गरजेचे आहे. जर शंभर
टक्के मतदान झाले नाही तर, निवडूणूकीचा निर्णय कदाचीत तितका पारदर्शी किंवा अचुक लागणार
नाही. तेव्हा लोकशाहितील मतदानाचे महत्त्व मतदारांना समजायला हवे. त्यात
राज्य व देशात बदल घडवून आणण्याची ताकत आहे हे समजुन घ्यायला हवे. सध्या देशात
चाललेल्या भ्रष्टाचार, जाती, धर्माचे मतभेद, राजकीय नेत्याची अनैतिक वागणूक या सर्व कारणामुळे आपण आपल्या लोकशाहीवरचा
विश्वास कमी होऊ देता कामा नये. आपल्या सर्व भारतीयाच्या हातामध्ये एक विलक्षण
शक्ती आहे ती म्हणजे मतदानाचा हक्क आणि आपण तो चोखपणे बजावू .....
Hiii bhava
ReplyDelete