Tuesday, 25 October 2016

चला मग संकल्प करुया....आपली ट्रेन आपणच स्वच्छ ठेऊ या....

सकाळी सकाळी काँलेजला जाण्यासाठी 7:07 मिनिटांची  लोकल होती. धावत धावत स्टेशन वर गेलो तर तेथे ट्रेन लेट होती, आजु बाजुला असलेल्या प्रवाशांना विचाले ट्रेन का लेट आहे, तर त्यांनी  थेट हे स्टेशन मास्तर पासुन ते रेल्वे मंत्री, प्रधानमंत्री याचा उधार करायला सुरवात केली आणि त्यांच्या  चर्चा सुरु झाल्या चांगल्या सुविधा देण्यासाठी काय करायला हवे नि काय करु नये.... हे सर्व सामान्य प्रवाशांचे  मत पण प्रवाशानो  आपण काय करायला हवे ....    
मुंबईकरांसाठी त्याची लाईफ लाईन ही सकाळी 4:12 मिनिटांची सुरु होत तर रात्री 12.34 पर्यत ही धवत असते जगामध्ये दुर-या क्रमांक हा मुंबई मधील लोकलचा लागतो सर्वात जास्त लोकसंख्या ने आण करण्याच काम ही लोकल करत असते. अत्यंत कमी शुल्कामधे  लोकल प्रवास हा होत असतो भारतातील सर्वात स्वस्त वाहतुक सेवा म्हणुन रेल्वे आपले काम करत आहे प्रत्येक प्रवाशाच्या टिकिटामध्ये रेल्वे ला 36 टक्के तोटा होतो. प्रवाशासाठी मोफत वायफाय सेवा सुध्दा पुरवत आहे, त्याच बरोबर इतर ही सेवा रेल्वे कडुन पुरवल्या जातात.ऐवढ्या मोठ्या प्रमाणात सेवा पुरवताना काही प्रमाणात चुका ह्या रेल्वे प्रशासनाच्या ही आहेत  पण त्याच बरोबर  काही चुका ह्या प्रवाशाच्याही आहे हे मान्य करु या
सकाळच्या पहील्या फेरीपासुन रेल्वेमधील ती बाई पहील्या प्रवाशाना सांगत असते...रेल्वे  रूल ओलांडू नका, थुंकु नका, विना टिकीट प्रवास करु नका, चालत्या ट्रेन मधुन डोकाऊ नका,कागदाचे तुकडे आणि फळांचे आवरणे कचराकुंडीच टाका, रेल्वे परिसर स्वच्छ ठेवा पण त्या सूचना कडे लक्ष न देता तोंडात तंबाखु किंवा पान खाऊन रुळावर थुंकत हे प्रवासी हे विराटने कसे खेळावे व मोदी ने काय करावे. विराट मोदी त्यांचे काम ते  करतील आज पासुन आपण आपले काम करु नवा इतिहस घडुन माझ्या लोकलचे नाव जगात प्रत्येक जण घेईल असे काम करु...... 
शिस्तीनेच राष्ट्र घडते, चला मग संकल्प करु आपली ट्रेन आपणच स्वच्छ ठेऊ....

मतदानाचे महत्त्व भारतीय लोकशाहीत...

लोकांनी, लोकांनसाठी व लोकांच्या हितासाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही ही भारतामध्ये अस्तीत्वात आहे.भारतातील लोकशाहीमुळेच राजकारणात लोकांचा प्रत्यक्ष सहभाग शक्य आहे. लोकांनी निवडुन दिलेला नेता देशाची, प्रदेशाची कामगिरी पाहतो.  यामुळेच बहुमताने निवडूण गेलेला नेता नागरिकांच्या मतदानामुळेच राज्य करु शकतो.
 जगातील विविध देशांमध्ये अशा वेगवेळ्या राज्यपध्दतींचा अवलंब केला जातो. हुकुमशाही राज्य अधिक जहाल व काटेकोर वाटते. त्या मानाने लोकशाही राज्यापध्दती मवाळ व नागरीकांच्या मताला महत्व देणारी  अशी असते. मात्र, जेव्हा लोकशाही ही हुकुमशाही  राज्यपध्दती सारखी वागू लागते त्यावेळी मात्र, लोकशाही व लोकांचे  राज्य हे नावापुरताच उरते. निवडणुकीत नेता निवडून आल्यानतंर  त्याच्या कामाच्या  कालावधीत त्य नेत्याची कामगिरी  त्याची पुढील राजकीय कारकिर्द निश्चित करत असते. प्रदेशातील सुख-सोयी, त्यांच्या मुलभूत गरजांची योग्यरित्या पुर्तता करण्याचे महत्वाचे कर्तव्य या नेत्याचे असते. तसेच आणखी एक महत्वाची जबाबदारी या नेत्यावर असते ती म्हणजे नागरिकांच्या सरंक्षणांची. ते ज्या प्रदेशात राहातात तिथे सुरक्षितता असल्याची भावना व विश्र्वास त्यांना असायला हवा. अशा विविध गुणांनी व कामगिरींनी समृद्ध नेता मिळणं कठीणंच झालय म्हणा......!  पण, ज्या नेत्याविषयी असा विश्र्वास वाटतो त्या नेत्याला लोक मतदान करतात. ज्यामुळे, योग्य नेता निवडून देण्याची ताकत मतदानातच व नागरिकांतच असल्याचे दिसते. मात्र, या ताकदीची किमया योग्यरित्या दाखवली जात नाही. त्याचे प्रमाण ही कमी झाले आहे. नेत्यांच्या, राजकराणी लोकांच्या मळलेल्या व मनातुन  उतरलेल्या प्रतिमेला मत देण्याची इच्छाच आता उरलेली नसल्याचे दिसते

पण, यातुन देशाला होणारा तोटा मात्र नागरिकांनो आपल्यालाच होणार आहे. मतदानाचे महत्त्व समजून घेणं गरजेचे आहे. जर शंभर टक्के मतदान झाले नाही तर, निवडूणूकीचा  निर्णय कदाचीत तितका पारदर्शी किंवा अचुक लागणार  नाही. तेव्हा  लोकशाहितील  मतदानाचे महत्त्व मतदारांना समजायला हवे. त्यात राज्य व देशात बदल  घडवून आणण्याची  ताकत आहे हे समजुन घ्यायला हवे. सध्या देशात चाललेल्या भ्रष्टाचार, जाती, धर्माचे मतभेद, राजकीय नेत्याची अनैतिक वागणूक  या सर्व कारणामुळे आपण आपल्या लोकशाहीवरचा विश्वास कमी होऊ देता कामा नये. आपल्या सर्व भारतीयाच्या हातामध्ये एक विलक्षण शक्ती आहे ती म्हणजे मतदानाचा हक्क आणि आपण तो चोखपणे बजावू .....